• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज कनेक्शन न मिळाल्याने धामणी-पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी:- तेजस वाळुंज

धामणी (ता. आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धामणी येथे शेतकऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत असून शेतीसाठी पुरेशा पाण्याची सुविधा नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या


या समस्येवर उपाय म्हणून धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत डिंभा धरणाच्या उजव्या कालव्यावरून सुमारे तीन ते सात किलोमीटर अंतरावरून तब्बल नऊ पाईपलाईन टाकण्याचा मोठा उपक्रम राबवला आहे. शेतीला बारमाही पाणी मिळावे आणि बागायती शेतीचा विकास व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वतःच्या खर्चातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून ही योजना उभारली आहे. या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले असून काहींनी आपले सातबारा गहाण ठेवून निधी उभारला आहे. मोठ्या अपेक्षेने आणि मेहनतीने उभारलेली ही पाईपलाईन योजना आता वीज कनेक्शनअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा मिळत नसल्याने संपूर्ण योजना अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाकडून सोलर पंपाचा पर्याय सुचविला जात आहे; मात्र सोलर पंपातून अपेक्षित क्षमतेने वीज उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नाही आणि शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात येत आहे.
सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे. जर वेळेत वीज कनेक्शन मिळाले नाही, तर उभारलेली संपूर्ण पाईपलाईन योजना वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर धामणी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून शासनाने तातडीने लक्ष घालून या योजनेसाठी वीज कनेक्शन मंजूर करावे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

लाईनमन दिवस सांगलीत उत्साहात साजरा: अखंडित विद्युत पुरवठा होणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘प्रकाशदुतांचा’ झाला सन्मान

Next Post

12 मार्च ला भेंडाळा परीसरातील शेतकरी व शेतमजूरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन *जिल्हा कांग्रेस कमेठीचा जाहीर पाठिंबा

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
4
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

12 मार्च ला भेंडाळा परीसरातील शेतकरी व शेतमजूरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन *जिल्हा कांग्रेस कमेठीचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In