• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम!* *डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित उचल करण्याचे निर्देश…!*

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित अंतर्गत असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आले होते.मात्र अद्यापही त्या धानाची उचल न झाल्याने संपूर्ण धान उघड्यावर पडून आहे. परिणामी हे धान खराब होण्याच्या मार्गावर असून गावातील गुरेढोरे ते खात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान अशा प्रकारे वाया जात असल्यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मातीमोल होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

दरम्यान या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उमानूर येथे प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतली.

यावेळी त्यांनी टी.डी.सी.चे अधिकारी राजूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत तातडीने धान उचल करण्याचे व खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याचे निर्देश दिले.या पाहणी दौऱ्यात अजय नैताम माजी जि.प. सदस्य, भास्कर तलांडे माजी सभापती, अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,लक्ष्मीस्वामी अट्टेला,शंकरीताई पोरंतेट सरपंच,गोविंदगाव,शामराव गावडे,बापू गांदार्ला यांच्यासह शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्थानिक शेतकऱ्यांनी त्वरित धान उचल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Previous Post

धोंदलगाव सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड

Next Post

कळंबोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा- तुकाराम बीज भक्तिमय वातावरणात संपन्न..

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
32
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
कळंबोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा- तुकाराम बीज भक्तिमय वातावरणात संपन्न..

कळंबोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा- तुकाराम बीज भक्तिमय वातावरणात संपन्न..

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In