• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद..आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

केज: केज मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय नियोजनात केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते कामांसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित कामांनुसार धारूर, तांदळवाडी, उंदरी, कळब, अंबा आणि होळ या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील ९.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता सुधारण्यासाठी प्रदीर्घ काळापासून मागणी होत होती. त्याचप्रमाणे, अंबाजोगाई तालुक्यातील नागापूर, साकूड ते अंबाजोगाई या दरम्यानच्या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी या कामांसाठी संबंधित विभागांकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. या दोन्ही कामांची एकूण लांबी २४.५० किलोमीटर असून, राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा मार्ग अंतर्गत ही विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. या रस्ते सुधारणेमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून स्थानिक व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

RelatedPosts

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

Previous Post

कुरुंदवाड मध्ये उन्हाळ्यात शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी…

Next Post

विहीरगाव (गोंडपिंपरी) येथे दारू व्यसनमुक्तीपर सत्संग कार्यक्रम उत्साहात

Related Posts

Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
1
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
1
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
0
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
0
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
1
Blog

ग्रामीण विकासासाठी ‘अकोला पॅटर्न’ राज्यभर राबवणार – सुजात आंबेडकर

June 19, 2026
1
Next Post

विहीरगाव (गोंडपिंपरी) येथे दारू व्यसनमुक्तीपर सत्संग कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In