कन्नड प्रतिनिधी: दि 9 मार्च 26 मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण! कन्नड मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
शासनाकडून रस्ते विकासाच्या विविध कामांसाठी २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे दळणवळण अधिक सोपे होणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
या निधीतून प्रामुख्याने मुख्य रस्ते आणि जोड रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश आल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




