• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित

by
March 9, 2026
in Blog
0
धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित
0
SHARES
20
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेशांच्या आधारे ७० कोटी रु मावेजाची रक्कम २४० कोटी रुपयांनी वाढून सुमारे ३१० कोटी रुपये केली; बनावट लाभार्थ्यांना ७५ कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा दिला – आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थितआमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यानंतर एसआयटी चौकशी, अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, तपासाला वेगप्रतिनिधी -भूसंपादन प्रक्रियेनुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन महामार्गासाठी संपादित केली जाते त्यांना नोटीस देणे, मोजणी करणे, त्यानंतर मोबदल्याचा अवॉर्ड मंजूर करणे आणि शेवटी लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे अशी नियमित प्रशासकीय प्रक्रिया असते. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला होता.धुळे–सोलापूर महामार्गासाठी सुरुवातीला सुमारे ७० कोटी रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. मात्र बनावट आदेशांच्या आधारे ही रक्कम २४० कोटी रुपयांनी वाढून सुमारे ३१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. त्यातील सुमारे ७५ कोटी रुपये बनावट लाभार्थ्यांना वाटप झाल्याची गंभीर बाब आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून समोर आली आहे.धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली असून या प्रकरणाला गती मिळण्यामागे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तारांकित प्रश्न क्रमांक २५२५८ च्या माध्यमातून त्यांनी हा गंभीर प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासन आणि प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली.या प्रकरणात १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत ४८ दिवसांत तब्बल १५४ बनावट आदेश काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली २२ एप्रिल रोजी झालेली असताना १७ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५० आदेश काढण्यात आल्याने संशय अधिकच बळावला होता. तसेच वाढीव मोबदल्यासाठी १५ टक्के कमिशन घेतल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्याचेही आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासनाने बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महसूल विभागातील काही अधिकारी, कंत्राटी कर्मचारी (डेटा एन्ट्री ऑपरेटर्स) तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या मध्यस्थांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त केले आहे. लवकरच झोपली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचे तसेच शासनाची हडपलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सभागृहात आवाज उठविल्यामुळेच तपासाला गती मिळाली असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.#BabanraoLonikar#DhuleSolapurHighway#LandAcquisitionScam#SITInquiry#MaharashtraPolitics#CorruptionExposed#ParaturMantha#JusticeForFarmers

Previous Post

महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे……. प्रा. टुपके सर

Next Post

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय चा जाहीर पाठिंबा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय चा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In