• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिनानिमित्त दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात HPV लसीकरण कक्षाचे उद्घाटन

by
March 10, 2026
in Blog
0
जागतिक महिला दिनानिमित्त दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात HPV लसीकरण कक्षाचे उद्घाटन
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

दर्यापूर / प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात HPV लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. गजाननभाऊ लवटे यांच्या अर्धांगिनी सौ. ज्योतीताई लवटे यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी सौ. ज्योतीताई लवटे यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी ही लस अत्यंत उपयुक्त असून पात्र मुलींनी आणि महिलांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डाबेराव यांनी उपस्थितांना एचपीव्ही लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ही लसीकरण मोहीम प्रामुख्याने ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी राबविण्यात येत असून गर्भाशयमुख कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ही लस प्रभावी ठरते.

राज्यभरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या या HPV लसीकरण कक्षामुळे स्थानिक स्तरावर महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत समाजातील सर्व पात्र मुली व महिलांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक माहितीसाठी स्थानिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या अर्धांगिनी सौ. मंदाकिनीताई वानखडे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुशभाऊ कावडकर, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीपभाऊ वडतकर, दर्यापूर विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख गोपालभाऊ अग्रवाल, युवासेना सर्कल प्रमुख आशिषभाऊ लायले, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. वर्षाताई भोंडे, सौ. डॉ. भावनाताई भुतडा यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

🟣 व्यंकटराव शिक्षण संकुलात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा🔶 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; शिक्षिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद

Next Post

आता नाकासंबंधित सर्व प्रकारच्या ऍलर्जीच्या तपासण्या मिरजेत उपलब्ध: पुण्या मुंबई मध्ये जायची गरज नाही मिरजेतील अश्विनी प्रसाद रुग्णालयात होतेय तपासणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
38
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
आता नाकासंबंधित सर्व प्रकारच्या ऍलर्जीच्या तपासण्या मिरजेत उपलब्ध: पुण्या मुंबई मध्ये जायची गरज नाही मिरजेतील अश्विनी प्रसाद रुग्णालयात होतेय तपासणी

आता नाकासंबंधित सर्व प्रकारच्या ऍलर्जीच्या तपासण्या मिरजेत उपलब्ध: पुण्या मुंबई मध्ये जायची गरज नाही मिरजेतील अश्विनी प्रसाद रुग्णालयात होतेय तपासणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In