• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू

by
March 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

उल्हासनगर / प्रतिनिधी:
उल्हासनगर शहरात कर्तव्य बजावत असताना एका कंत्राटी सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाला असून पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादू जगताप (वय ३५) असे मृत कंत्राटी सफाई कामगाराचे नाव आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोणार्क इन्व्हायको या कंपनीत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरातील आनंद आईस्क्रीम पार्लरजवळ घडली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

नेहमीप्रमाणे महादू जगताप सकाळी साफसफाईचे काम करत असताना दुर्गेश गुप्ता (वय ३१) या तरुणाने त्यांच्यावर अचानक तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानक होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दुर्गेश गुप्ता याला ताब्यात घेत अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी नशेत असल्याचे समोर आले असून दोघांमध्ये यापूर्वीही काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पतीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी पूर्वी महादू जगताप (वय ३२) यांना मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका कुटुंबातील दोघांचा अल्पावधीत झालेला मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे उल्हासनगरमधील सफाई कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Previous Post

तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन

Next Post

अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न…

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न…

अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न...

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In