• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटलांना गावाने वाळीत टाकले, पुन्हा समाजात घेण्यासाठी 5 लाख मागितले; मिरज तालुक्यातील नरवाड जातपंचायतीचा संतापजक प्रकार

by
March 10, 2026
in देश विदेश
0
पाटलांना गावाने वाळीत टाकले, पुन्हा समाजात घेण्यासाठी 5 लाख मागितले; मिरज तालुक्यातील नरवाड जातपंचायतीचा संतापजक प्रकार
0
SHARES
20
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीत अजूनही जात पंचायतीचा विळखा गावागावात कायम आहे. मिरज तालुक्यातल्या नरवाड येथे जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदीवाली समाजाच्या एका कुटुंबावर जात पंचायतकडून बहिष्कृत करत समाजातून वाळीत टाकण्यात आले आहे. लग्नाबाबत तक्रार असलेल्या महिलेला मदत केल्यामुळे या कुटुंबाला गावाने वाळीत टाकले. नरवाड गावातल्याच एका महिलेचा सासरची मंडळी आणि पतीकडून छळ करण्यात येत होता. पीडित महिलेला न्याय मिळावा अशी भूमिका उत्तम पाटील आणि कुटुंबीयांनी घेतली होती. याबाबत जात पंचायतीकडे तशी मागणी देखील करण्यात आली. मात्र, जात पंचायतीकडून महिलेला मदत न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, आपण मदत करतच राहिलो याच रागापोटी जातपंचायत कडून बहिष्कृत करण्यात आल्याचा आरोप उत्तम पाटील कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तम पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर नंदीवाली समाजाकडून बहिष्कार घालण्यात आलाय, गावातल्या समाजाच्या मंदिरामध्ये देखील पाटील कुटुंबीयांवर प्रवेश बंदी आहे,इतकंच नव्हे तर समाजातील कोणताही व्यक्ती उत्तम पाटील कुटुंबीयांसमोर बोलत नाही. याशिवाय कोणत्याच धार्मिक विधी आणि इतर समारंभ पासून त्यांना लांब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पाटील कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. या घटनेनंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मिरज पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत. याबाबत तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत पाटील कुटुंबाकडून नरवाड ग्रामपंचायत तिकडे देखील तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जात पंचायत व पाटील कुटुंब यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारच तोडगा निघाला नाही. आता याबाबत विरोध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे त्यामुळे चामुक विचाराने या गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं नरवाड ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. पुरोगामी असणाऱ्या सांगली जिल्ह्यात अजूनही जात पंचायती सारख्या गोष्टी अस्तित्वात असून त्याच्या माध्यमातून होणारी सुरूच आहे. त्यामुळे जात पंचायतीचा विळखा कधी संपणार असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे

Previous Post

🔴 जागतिक महिला दिनानिमित्त जे. पी. नाईक पतसंस्थेकडून श्रमिक महिलांचा गौरव

Next Post

🌸 गाव पुरळ ग्रामपंचायत कार्यालयात होळी हा सण उत्साहात साजरा 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸 गाव पुरळ येथे ग्रामपंचायत पुरळ मध्ये होळी सणानिमित्त कापड खेळे देव हे ग्रामपंचायत पुरळ येथे येऊन शिमगा उत्सव नाचत गाजत वाजत ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने पार पाडला. अनेक स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे पदाधिकारी व मान्यवर यांच्या साह्याने शिमगा उत्सवाचे कापड खेळे देव यांचे स्वागत करून अतिशय आनंदाने कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून अतिशय उत्साहात ग्राम पंचायत पुरळ येथे ग्रामस्थानाने साजरा केला. माननीय सरपंच सौभाग्यवती अनुश्री तावडे यांच्या हस्ते कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करण्यात आली. व अनेक मान्यवरांनी व स्थानिक ग्रामस्थानांनी सुद्धा कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपली गारानी सांगून श्रीफळ देऊन आपले मनोगत आपले नवस आपल्या देवापुढे मांडल्या. असा हा शिमगा उत्सव दर सालाबाद प्रमाणे साजरा केला जातो. अनेक मान्यवर त्याची पूजा दर सालाबाद प्रमाणे करतात. जे गावच्या देवस्थानाचे रीती रिवाज आहे ज्या संस्कृती आहेत त्याचप्रमाणे या कापड खेळे देव यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर अतिशय भक्ती भाव व संस्कृतीला शोभणारे ढोल ताशांच्या गजरात एक कापड खेळे त्यांना सजवणारे व भूषवणारे व भक्ती भावाने त्याची पूजा करणारे ग्रामीण स्थानिक गावकरी त्यांच्या स्वागतासाठी नृत्य सादर करतात हे नृत्य बघण्यासाठी अनेक चाकरमानी स्थानिक ग्रामस्थ बघायला येतात. गाव पुरळ येथे दर सालाबाद प्रमाणे रितीरिवाजाप्रमाणे हे कापड खेळे प्रत्येक वाडी वाडीत जाऊन घरोघरी जाऊन तुळशीची पूजा अर्चना करतात व तेथे आपले नृत्य सादर करतात. असा हा पुरळगाव पाच वाडीचा मानकरी असा आहे. या गावातले मानकरी आपापल्या परीने देवस्थानाची पूजा अर्चना करून त्याचे काही जे देवाचे नवस असतात ते दर सालाबाद प्रमाणे पूर्ण करून आपल्या देवाला रखवालीचा साकडं घालून राजे करून दर सालाबाद प्रमाणे हा सण व्यवस्थित साजरा व्हावा ही देवापुढे प्रार्थना करतात आणि हा सण साजरा करतात. कोकणातील शिमगा हा उत्सव हा बघण्यासारखा व आनंदवर्धक व उत्साहवर्धक असा आहे एक आठवडा तरी हा सण कोकणामध्ये सर्वत्र चालतो. या सणानिमित्त घरादारात मुंबईतून प्रदेशातून विदेशातून लोक हा सण यांचे नृत्य पहावयास येतात हे पाहण्यासारखे असते आपल्या भारतीय संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृतीला शोभणारे असे असते. ढोल ताशाच्या गजरात प्राचीन काळी ज्या वेशभूषा होत्या त्या परिधान करून हे नृत्य येतील ग्रामीण लोक सर्वांपुढे सादर करतात असा हा सण ग्रामपंचायत पुरळ मध्ये अतिशय आनंदाने व उत्साहवर्धक व स्थानिक ग्रामस्थ व मानकरी व पूजेकरी यांच्या साह्याने हा साजरा केला जातो. अशीच भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती या संस्कृतीला कोट्यांना कोटी वर्ष अशी चालावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के 🌸देवगड तालुका प्रतिनिधी 🌸

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

April 18, 2026
36
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

19
Next Post

🌸 गाव पुरळ ग्रामपंचायत कार्यालयात होळी हा सण उत्साहात साजरा 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸 गाव पुरळ येथे ग्रामपंचायत पुरळ मध्ये होळी सणानिमित्त कापड खेळे देव हे ग्रामपंचायत पुरळ येथे येऊन शिमगा उत्सव नाचत गाजत वाजत ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने पार पाडला. अनेक स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे पदाधिकारी व मान्यवर यांच्या साह्याने शिमगा उत्सवाचे कापड खेळे देव यांचे स्वागत करून अतिशय आनंदाने कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून अतिशय उत्साहात ग्राम पंचायत पुरळ येथे ग्रामस्थानाने साजरा केला. माननीय सरपंच सौभाग्यवती अनुश्री तावडे यांच्या हस्ते कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करण्यात आली. व अनेक मान्यवरांनी व स्थानिक ग्रामस्थानांनी सुद्धा कापड खेळे देव यांची पूजा अर्चना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपली गारानी सांगून श्रीफळ देऊन आपले मनोगत आपले नवस आपल्या देवापुढे मांडल्या. असा हा शिमगा उत्सव दर सालाबाद प्रमाणे साजरा केला जातो. अनेक मान्यवर त्याची पूजा दर सालाबाद प्रमाणे करतात. जे गावच्या देवस्थानाचे रीती रिवाज आहे ज्या संस्कृती आहेत त्याचप्रमाणे या कापड खेळे देव यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर अतिशय भक्ती भाव व संस्कृतीला शोभणारे ढोल ताशांच्या गजरात एक कापड खेळे त्यांना सजवणारे व भूषवणारे व भक्ती भावाने त्याची पूजा करणारे ग्रामीण स्थानिक गावकरी त्यांच्या स्वागतासाठी नृत्य सादर करतात हे नृत्य बघण्यासाठी अनेक चाकरमानी स्थानिक ग्रामस्थ बघायला येतात. गाव पुरळ येथे दर सालाबाद प्रमाणे रितीरिवाजाप्रमाणे हे कापड खेळे प्रत्येक वाडी वाडीत जाऊन घरोघरी जाऊन तुळशीची पूजा अर्चना करतात व तेथे आपले नृत्य सादर करतात. असा हा पुरळगाव पाच वाडीचा मानकरी असा आहे. या गावातले मानकरी आपापल्या परीने देवस्थानाची पूजा अर्चना करून त्याचे काही जे देवाचे नवस असतात ते दर सालाबाद प्रमाणे पूर्ण करून आपल्या देवाला रखवालीचा साकडं घालून राजे करून दर सालाबाद प्रमाणे हा सण व्यवस्थित साजरा व्हावा ही देवापुढे प्रार्थना करतात आणि हा सण साजरा करतात. कोकणातील शिमगा हा उत्सव हा बघण्यासारखा व आनंदवर्धक व उत्साहवर्धक असा आहे एक आठवडा तरी हा सण कोकणामध्ये सर्वत्र चालतो. या सणानिमित्त घरादारात मुंबईतून प्रदेशातून विदेशातून लोक हा सण यांचे नृत्य पहावयास येतात हे पाहण्यासारखे असते आपल्या भारतीय संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृतीला शोभणारे असे असते. ढोल ताशाच्या गजरात प्राचीन काळी ज्या वेशभूषा होत्या त्या परिधान करून हे नृत्य येतील ग्रामीण लोक सर्वांपुढे सादर करतात असा हा सण ग्रामपंचायत पुरळ मध्ये अतिशय आनंदाने व उत्साहवर्धक व स्थानिक ग्रामस्थ व मानकरी व पूजेकरी यांच्या साह्याने हा साजरा केला जातो. अशीच भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती या संस्कृतीला कोट्यांना कोटी वर्ष अशी चालावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के 🌸देवगड तालुका प्रतिनिधी 🌸

ताज्या बातम्या

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

April 25, 2026
रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

April 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In