• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

by
March 19, 2026
in देश विदेश
0
जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पाच हजारांहून अधिक प्रगणक करणार जनगणना

जनगणना 2027 ही संपूर्णत: डिजीटल स्वरुपात असून प्रशासनाने याकरिता जय्यत तयारी केली आहे. यामध्ये ग्रामीण भागाकरिता तहसिलदार हे चार्ज अधिकारी असून शहरी भागाकरिता मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी आहेत. सुमारे 5124 प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत सांगली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनगणना होणार आहे. सांगली जिल्ह्याकरिता प्रधान जनगणना अधिकारी हे जिल्हाधिकारी सांगली असून जिल्हा जनगणना अधिकारी हे निवासी उपजिल्हाधिकारी सांगली असणार आहेत, असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये शासनाकडून राबविली जाणार आहे. पहिला टप्पा हा घरयादी व घरगणनेचा असून 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान होणार आहे. या कालावधीमध्ये प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. ही घरगणना करित असताना ते शासनाने ठरवून दिलेले 34 प्रश्न घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तीला विचारुन सदरची माहिती HLO ॲपद्वारे जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष क्षेत्रकार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये census.gov.in/se या वेबसाईटवर व्यक्ती स्वतः आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरु शकणार आहे. तदनंतर जनगणना 2027 चा टप्पा दोन कार्यक्रम माहे 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीत प्रत्यक्ष जनगणना केली जाणार आहे.सांगली जिल्ह्यातील जनगणना 2027 च्या पूर्वतयारीबाबत दिनांक 4 ते 6 मार्च 2026 या कालावधीत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रशिक्षण झाले. जिल्हा जनगणना कार्य निर्देशालय महाराष्ट्र, बेलार्ड इस्टेट मुंबई यांचेकडील सहाय्यक संचालक कविता गोडबोले व प्रणय कुडकर हे प्रशिक्षक होते.भारत सरकारकडून आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. जनगणना ही देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक असून ती शासनाच्या धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जनगणना 2027 चा उद्देश देशातील लोकसंख्येची अद्ययावत व अचूक माहिती संकलित करणे हा आहे. या प्रक्रियेत लोकसंख्येची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये याबाबत माहिती गोळा केली जाईल. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य सरकारांना विकास योजना तयार करणे, संसाधनांचे योग्य वाटप करणे आणि विविध क्षेत्रांतील पायाभूत सुविधा नियोजन करण्यास मदत होईल. या वेळी जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

Next Post

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
संग्रहित छायाचित्र

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In