• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

by
March 19, 2026
in देश विदेश
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून निधी वाटप

जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत विविध क्षेत्रात जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. या अनुषंगाने पोलीस दल व कारागृह विभागाच्या पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मंजुरीने व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रयत्नातून पोलीस दल तसेच कारागृह आस्थापना बळकटीकरणासाठी अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कार्यालयामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची 18 कामे मंजूर करण्यात आली असून, यामध्ये पोलीस निवासस्थानांची उभारणी, एम.टी. सेक्शनसाठी पार्किंग शेड बांधकाम तसेच पोलीस मुख्यालयासाठी संरक्षक भिंतीचे बांधकाम अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांसाठी सुमारे 5 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे अंतर्गत रस्त्याचे नूतनीकरण करणे व वाहन विभागासाठी मोटर शेडचे बांधकाम करणे अशा दोन कामांसाठी जवळपास 1 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच, कारागृह विभागासाठीही पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात आला आहे. अधिक्षक, सांगली जिल्हा कारागृह, सांगली कार्यालयामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये कारागृहाचे बरॅक व संरक्षक भिंत विस्तारीकरण, कारागृह येथील तट क्र.१ व २ मधील तटाची उंची वाढवून व त्यावर फेन्सिंग तारेचे कुंपण करणे, इमारतीचे विस्तारीकरण, कंपोस्ट खत मशिनसाठी शेड करणे अशी 8 कामे असून, त्यासाठी 89 लाख, 49 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अधीक्षक तथा संपर्क अधिकारी स्वतंत्रपूर खुली वसाहत, ता. आटपाडी येथील शासकीय निवासस्थानास संरक्षक भिंत बांधकाम व बंद्यांच्या नवीन वसाहतीमधील ड्रेनेजचे काम, महिलांकरिता स्वच्छतागृह बांधकाम, बंद्यांच्या जुन्या वसाहतीची दुरुस्ती करणे आणि चारचाकी वाहन खरेदी करणे अशा चार कामांसाठी 83 लाख 23 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.एकूणच या कामांमुळे पोलीस दल व कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन येत्या काळात जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

Next Post

كلمة مرور Dr Wager Bonus 2026 أفضل عرض للتسجيل لامتلاك شهر فبراير

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

كلمة مرور Dr Wager Bonus 2026 أفضل عرض للتسجيل لامتلاك شهر فبراير

ताज्या बातम्या

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

May 3, 2026

धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, अल्लापल्लीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026
भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In