• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतरस्त्याचा वाद निकाली; तहसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
शेतरस्त्याचा वाद निकाली; तहसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे मुरली येथे शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला असून तहसीलदार अभिजित जगताप यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मौजे मुरली येथील शेतकरी जीवन नारायण शिंदे व प्रकाश नारायण शिंदे यांच्या गट क्रमांक १६६ मधील शेतात बैलगाडीने ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी तहसील कार्यालय माहूर येथे गट क्रमांक १६५ व १८१ मधून रस्ता देण्याची मागणी केली होती.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार अभिजित जगताप व तलाठी साहेबराव गावंडे यांनी २४ रोजी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी गट क्रमांक १६५ व १८१ चे मालक कमलाबाई बाबाराव सूर्यवंशी व साहेबराव माधवराव सूर्यवंशी यांचे समुपदेशन करण्यात आले.

समुपदेशनानंतर संबंधित जमीनमालकांनी जीवन शिंदे व प्रकाश शिंदे यांच्या शेतासाठी बैलगाडी रस्ता देण्यास संमती दिल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद निकाली निघाला. तसेच दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले खटले मागे घेण्याचेही कबूल केले.

दरम्यान, गट क्रमांक १६५, १६६ व १८१ यांची सर्वांच्या संमतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख, माहूर यांच्या मार्फत मोजणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

यावेळी कमलाबाई सूर्यवंशी, बाबाराव सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, जीवन शिंदे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद तातडीने मिटल्याने शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

बेपत्ता मुलीच्या प्रकरणी न्यायासाठी कुटुंबीयांची धडपड; सखोल चौकशीची मागणी

Next Post

आदर्श समाजसेवक विजय कदम यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
23
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
91
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

आदर्श समाजसेवक विजय कदम यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In