• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आष्ट्यात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ठरतेय खेळाडूंसाठी वरदान; गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
आष्ट्यात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ठरतेय खेळाडूंसाठी वरदान; गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन सोहळा संपन्न
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

आष्टा (प्रतिनिधी) : आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या लोकनेते राजाराम बापू पाटील सभागृहात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अकॅडमीचे सचिव आशितोष पाटील यांच्या पुढाकाराने आणि महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रेश्मा माने उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व प्राचार्य आर. डी. सावंत होते.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

प्रारंभी आशितोष पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेश्मा माने यांनी महिलांसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत तायक्वांदो, वुशु व स्केटिंगसारख्या क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण लहान वयापासून देणे ही अत्यंत स्तुत्य बाब असल्याचे नमूद केले. त्यांनी स्वर्गीय कपिल बोते यांच्या कार्याचाही उल्लेख करत अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात आर. डी. सावंत यांनी महाविद्यालयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत राजाराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या भूमीतून अनेक गुणवंत खेळाडू घडल्याचे सांगितले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, कर निर्धारण अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील, सांगली जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव सुरेश चौधरी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात तायक्वांदो, वुशु व स्केटिंग या क्रीडाप्रकारात तालुका, राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण घेतलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. तायक्वांदो खेळाडूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास नगरसेवक डॉ. प्रकाश आडमुठे, सुभाष खिलारे, सुनील खिलारे, अजित सूर्यवंशी, आकाश पवार, संकेत कांबळे, विनोद राठोड तसेच स्टीफन व स्टीवन काकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन अमृत डवंग व निलेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. के. पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद कुचीवाले यांनी मानले. मोठ्या संख्येने उपस्थित पालक व क्रीडाप्रेमींमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Tags: Kaustubh Lole
Previous Post

तारापूर येथील आरती फार्मलॅबमध्ये विषारी वायूगळती; कामगार रुग्णालयात दाखल

Next Post

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In