• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध वाळू उत्खननाला ऊत; प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in क्राईम
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव तालुक्यातील मार्डी सर्कल अंतर्गत दांडगाव, आपटी व घाट परिसरात अवैध वाळू उत्खननाचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महसूल विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे वाळू माफियांनी अक्षरशः कायद्याला धाब्यावर बसवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपटी घाट परिसरात नियमांचे उल्लंघन करून पोकलेन व जेसीबीसारख्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार घाटातील रेती उपसा हा मर्यादित प्रमाणात व ठराविक प्रक्रियेद्वारे करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र यंत्रांच्या वापरातून बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

नदी पात्राच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन होत असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पर्यावरणीय हानीसह नैसर्गिक समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकमध्ये ओव्हरलोड वाहतूक केली जात असून ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या सर्व प्रकाराची माहिती असूनही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आपटी परिसरातील नागरिकांनी केला आहे. अवैध उत्खनन तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

नरसाळा येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Next Post

मारेगाव–वणी महामार्गावर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
198
Next Post

मारेगाव–वणी महामार्गावर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In