• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचा विक्रम; ३६८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड, तिन्ही विभागांना १००% प्लेसमेंट
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचालित परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाने प्लेसमेंटच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन करत सन २०२५-२६ मध्ये तब्बल ३६८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड करून विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तिन्ही विभागांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे.

महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट वसतिगृहामुळे राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. याच गुणवत्तेचा प्रत्यय या यशातून पुन्हा एकदा आला आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये एस.पी.एम. ऑटोकोम सिस्टिम प्रा. लि. (रांजणगाव), जाबिल सर्किट इंडिया प्रा. लि., झेड एफ स्टेरिंग केअर इंडिया प्रा. लि., फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लि., सिएट येडूसेस प्रा. लि., जॉन डीअर इंडिया प्रा. लि. (शिक्रापूर), टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम प्रा. लि., बजाज ऑटो प्रा. लि. (चाकण), मायक्रोटेक डेव्हलपर लि., आर.पी.जी. प्रा. लि., जनरल इंडस्ट्रियल कंट्रोल प्रा. लि. यांसारख्या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

विविध टप्प्यांतील मुलाखतींमधून परिक्रमा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३६८ जणांची निवड मिळवली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासामुळे हे यश शक्य झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्लेसमेंट परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Previous Post

कापूस जिनिंगला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

Next Post

फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post
फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र

फातिमा उर्दू शाळेतील शिक्षिकेच्या आमरण उपोषणाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा पाठिंबा; न्यायासाठी लढा तीव्र

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In