गंगाखेड (तालुका प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील खळी येथील कुमारी श्रद्धा पंडितराव पवार हिने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सीनियर क्लर्क पदावर नियुक्ती मिळवून गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
श्रद्धाने आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून येऊनही तिने स्पर्धात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून दाखवले, याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. श्रद्धाच्या या यशामुळे अनेक मुलींना नवी दिशा आणि प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी गावातील मान्यवर, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











