• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘महिला राज’; ६ पैकी ५ सभापतीपदे महिलांकडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत महिलांनी वर्चस्व गाजवत ६ पैकी ५ पदांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेत ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवडीनंतर सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी “आता पाचही पदांवर बहिणी आल्या आहेत, तेव्हा लाडक्या भावांना सांभाळून घ्या,” अशी मिश्किल टिप्पणी करताच हास्यलहरी उमटल्या. निवडीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

RelatedPosts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी शीतल यादव यांची निवड झाली असून, यापूर्वी त्यांचे पती प्रवीण यादव यांनीही हेच पद भूषवले होते. बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सारिका नांदेंकर यांची निवड झाली असून, त्यांच्या कुटुंबाला राजकारणाचा मोठा वारसा आहे.

चंदगड तालुक्यातील विद्या विलास पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवत आपले स्थान बळकट केले, तर श्रद्धा गायकवाड यांनी पहिल्याच प्रयत्नात समाजकल्याण समितीच्या सभापतीपदावर निवड होत मोठे यश मिळवले.

या निवड प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विजय बलुगडे, माजी आमदार राजेश पाटील, उल्हास पाटील, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संजय यद्रावकर, सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या ऐतिहासिक निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचे मत व्यक्त होत असून, जिल्हा परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी

Next Post

रवळनाथ कॉलनीतील प्रलंबित सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
6
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
1
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
Next Post

रवळनाथ कॉलनीतील प्रलंबित सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In