• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारम येथे शेळी-मेंढी आठवडे बाजारास सुरुवात; शेतकरी हितासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

📝 अंदरसुल (प्रतिनिधी) :
येवला तालुक्यातील भारम येथे दर शनिवारी भरत असलेला आठवडे बाजार हा शेतकरी हिताचा ठरत असून आता या बाजारात शेळी-मेंढी खरेदी-विक्रीलाही सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

भारम हा परिसर डोंगरगाव, तळवाडे, पिंपळखुटे खुर्द/बुद्रुक, आडसुरेगाव, वाघाळे, रहाडी, वडजी, खरवंडी, देवदरी, ममदापूर, अंगुलगाव, कोळम खुर्द/बुद्रुक अशा सुमारे ८ ते १० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची ये-जा असते.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यापूर्वी या आठवडे बाजारात भाजीपाला, भुसार व धान्य व्यवहार होत होता. मात्र, डोंगरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरात शेतीमालाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार या कालावधीतही भारम व डोंगरगाव परिसरात शेतकऱ्यांची वर्दळ वाढलेली दिसून येते.

याच पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांची “चालती-बोलती बँक” मानल्या जाणाऱ्या शेळी-मेंढी वर्गीय जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र बाजार सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. विद्यमान सरपंच/प्रशासक श्रीमती मंदाताई गांजे यांच्या पुढाकारातून शनिवार, दि. ०४ एप्रिल २०२६ पासून ग्रामपंचायत कंपार्टमेंट येथे या बाजारास प्रारंभ होणार आहे.

या नव्या बाजाराचे भूमिपूजन सकाळी ९:३० वाजता करण्यात येणार असून परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी आणाव्यात, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांनी या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षेत यश

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षेत यश

राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षेत यश

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In