• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
आजरा शहरातील अमृतजल पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका सध्या नागरिकांना बसत असून ऐन उन्हाळ्यात शहरात ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमृतजल योजनेअंतर्गत गांधीनगर ओढ्यापासून आयडीयल कॉलनीपर्यंत पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली होती. तसेच गटारीचे बांधकामही रस्त्याच्या हद्दीपासून ७ ते ८ फूट आत करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आणि अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर त्रुटींविरोधात अन्याय निवारण समितीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असले, तरी आता दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना पाण्याविना राहावे लागत आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दरम्यान, नगरसेवक बामणे भाऊजी यांनी ही समस्या पालकमंत्री आबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत गटार व पाईपलाईनचे काम योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जनतेचे हाल :
• चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
• नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
• दुर्गम भागातील नागरिकांची अधिक गैरसोय

डॉ. स्मिता कुंभार यांनी सांगितले की, “सुरुवातीलाच नियोजनबद्ध काम झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.”

दरम्यान, ठेकेदार सुपरवायझर रमेश गस्ती यांनी माहिती दिली की, “काम रात्रंदिवस सुरू असून जमिनीखाली कठीण दगड लागल्याने थोडा विलंब होत आहे. मात्र लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

या संपूर्ण कामावर नगरसेवक असिफ सोनेखान हेही प्रत्यक्ष पाहणी करत असून प्रशासनाच्या चुका दुरुस्त करताना अजरावासीयांना मात्र कोरड्या घशाने वाट पाहावी लागत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न

Next Post

सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
4
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
8
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
1
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
Next Post
सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत

सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In