• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आहेरवाडीत श्रीमद रंभापुरी पीठाच्या शाखा मठात अभिनव शिवानंद देवरू यांचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील आहेरवाडी येथे श्रीमद रंभापुरी पीठाच्या शाखा मठात नूतन उत्तराधिकारी म्हणून अभिनव शिवानंद देवरू यांची नियुक्ती करण्यात आली. विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि संतांच्या सान्निध्यात त्यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

वीरशैव लिंगायत समाजाच्या पंचपीठांपैकी एक असलेल्या श्रीमद रंभापुरी पीठाचा शाखा मठ आहेरवाडी येथे असून, या मठाची स्थापना शेकडो वर्षांपूर्वी झालेली आहे. येथील मठाधिपती म्हणून कार्यरत असलेले श्री ष.ब्र. रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या कार्यकाळात धर्मप्रसारासह समाजाला सदमार्ग दाखविण्याचे कार्य केले. नुकतेच त्यांच्या लिंगैक्यानंतर उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली.

RelatedPosts

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

श्रीमद रंभापुरी जगद्गुरूंच्या आदेशानुसार विविध मठांच्या शिवाचार्यांच्या उपस्थितीत अभिनव शिवानंद देवरू यांचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी देवापूर (जि. कलबुर्गी) येथील मठाधिपती श्री शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांनी नूतन उत्तराधिकाऱ्यांना धर्मोपदेश केला.

या सोहळ्यास तरडगीचे श्री रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी, मादनहिप्परगाचे शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी, चौदापूरचे श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी, औरादचे मरुळसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी, तोनसहनहळ्ळीचे रेवणसिद्ध चेरतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीनिवास सरडगीचे श्री रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी आदी संत-महंतांचे दिव्य सान्निध्य लाभले.

यावेळी अभिनव शिवानंद देवरू यांचे “श्री ष.ब्र. १००८ अभिनव शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी” असे नामकरण करण्यात आले.

सोहळ्यानंतर सायंकाळी नूतन पट्टाधिकाऱ्यांची अड्डपालखी गावातून काढण्यात आली. ग्रामस्थ व महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. या सोहळ्यास आहेरवाडी, कुभारी, बंकलगी, करजगी आदी गावांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhimrao birajdar
Previous Post

श्री सिद्धनाथ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुस्ती व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Next Post

वाई नगरपरिषदेच्या गटार कामांवर प्रश्नचिन्ह; दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप

Related Posts

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
धार्मिक व सांस्कृतिक

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

April 4, 2026
25
मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
धार्मिक व सांस्कृतिक

मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

April 4, 2026
17
Next Post
वाई नगरपरिषदेच्या गटार कामांवर प्रश्नचिन्ह; दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप

वाई नगरपरिषदेच्या गटार कामांवर प्रश्नचिन्ह; दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

May 22, 2026
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

May 22, 2026
मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In