• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वृत्तपत्र जाहिरात दरवाढीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे; १५०% वाढीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
वृत्तपत्र जाहिरात दरवाढीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे; १५०% वाढीची मागणी
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०३ (प्रतिनिधी):
राज्यातील वृत्तपत्र उद्योगासमोरील वाढते आर्थिक संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय जाहिरात दरांमध्ये तात्काळ १५०% वाढ करावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे लाक्षणिक आंदोलन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शहादा येथेही हे आंदोलन करण्यात आले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ पासून वृत्तपत्र छपाईसाठी लागणाऱ्या कागद, शाई, वीज आणि मनुष्यबळ यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, शासकीय जाहिरात दर अद्याप जुन्याच निकषांवर आधारित असल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक ताण वाढला आहे. अनेक वृत्तपत्रांना बंद पडण्याची वेळ येत असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा हा उद्योग संकटात सापडला आहे.

संघटनेने आपल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरात १५०% वाढ करणे, शासकीय ई-टेंडर नोटिसेस पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातींचा किमान आकार २०० चौ.से. निश्चित करणे, तसेच जाहिरातींची बिले ३० दिवसांत अदा करणे यांचा समावेश आहे. तसेच १० वर्षे सेवा करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, पत्रकार पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करणे आणि सर्व जाहिराती माहिती व जनसंपर्क विभागामार्फतच देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, २५ वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांची प्रलंबित नैसर्गिक दरवाढ तात्काळ लागू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, जिल्हा संघटक प्रा. नेत्रदीपक कुवर, तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा पाया आहे. हा पाया आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला, तर जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा,” असे मत जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड

Next Post

शून्यातून शिखराकडे झेप: डॉ. राजेंद्र भारूड कोल्हापूरचे नवे आयुक्त

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
शून्यातून शिखराकडे झेप: डॉ. राजेंद्र भारूड कोल्हापूरचे नवे आयुक्त

शून्यातून शिखराकडे झेप: डॉ. राजेंद्र भारूड कोल्हापूरचे नवे आयुक्त

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In