• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेतपांदण रस्ता योजने’अंतर्गत १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ताड पिंपळगाव ते शेवता गाव शिवारातील सुमारे ८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

ताड पिंपळगाव आणि शेवता परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच उत्पादित माल बाजारपेठेत नेण्यासाठी कच्च्या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होत असल्याने दळणवळण विस्कळीत होत असे. या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा वनवास संपणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

यावेळी बोलताना आमदार संजना जाधव म्हणाल्या की, “मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाडी-वस्ती मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतपांदण रस्ते सक्षम झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळते. १ कोटी ६० लाखांच्या निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ काम करण्यावर आमचा भर असून उर्वरित रस्त्यांचे प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील.”

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने ताड पिंपळगाव व शेवता परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.

या शुभारंभ कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव

Next Post

अमरदास बाबा रोडवरील नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे नागरिक त्रस्त; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
46
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
22
Next Post

अमरदास बाबा रोडवरील नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे नागरिक त्रस्त; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

ताज्या बातम्या

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In