• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद (शेलारमळा) येथे श्री रासाईदेवी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न; अवकाळी पावसामुळे कुस्त्यांचा आखाडा रद्द

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
160
VIEWS
Ad 1

मळद (प्रतिनिधी) : शेलारमळा येथील आई श्री रासाईदेवीची वार्षिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मात्र, उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसामुळे कुस्त्यांचा भव्य आखाडा रद्द करावा लागल्याने कुस्तीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त झाली.

गुरुवारी सकाळी देवीच्या महाअभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली. दुपारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीसमोर दंडवत घालत शेरणी अर्पण केली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रात्री हलगी पथकाच्या गजरात आणि दारूकामाच्या भव्य आतिषबाजीसह देवीचा छबिना काढण्यात आला. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. त्यानंतर रात्री ‘कैरी मी पाडाची’ या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने यात्रेची रंगत आणखी वाढवली, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

दरम्यान, शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आला होता. आखाड्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि अनेक नामवंत पैलवान मैदानात दाखल झाले होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळे मैदान ओले व निसरडे झाल्याने कुस्त्यांचे सामने घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आखाडा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या कुस्तीप्रेमींना निराश होऊन परतावे लागले.

पावसाच्या या व्यत्ययानंतरही सायंकाळी ७ वाजता भाविकांच्या उपस्थितीत ‘मानाचा विडा’ वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली. संपूर्ण उत्सवाचे नियोजन श्री रासाईदेवी युथ फाउंडेशन, शेलारमळा यांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे करण्यात आले. पावसामुळे केवळ कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द झाला असला, तरी इतर सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रम उत्साहात पार पडले.

Previous Post

हरि अण्णा जाधव यांची तत्परता; अवकाळी पावसात पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत

Next Post

समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोरडे फूड्स कंपनीत निवड; सहा जणांना संधी

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
13
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
155
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
6
Next Post
समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोरडे फूड्स कंपनीत निवड; सहा जणांना संधी

समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोरडे फूड्स कंपनीत निवड; सहा जणांना संधी

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In