• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवटमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना; कोणत्याही प्रभागात पाण्याची समस्या जाणवणार नाही – निलोफर भाटी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनवटमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना; कोणत्याही प्रभागात पाण्याची समस्या जाणवणार नाही – निलोफर भाटी
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

किनवट (प्रतिनिधी) – उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन किनवट नगर परिषद प्रशासनाने यंदा आगाऊ उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील कोणत्याही प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा सभापती निलोफर भाटी यांनी युद्धस्तरावर दुरुस्ती कामे हाती घेतली आहेत.

नगराध्यक्षा सौ. सुजाता एंड्रलवार यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील गळती असलेल्या पाइपलाइन दुरुस्त करण्यासोबतच सार्वजनिक नळांवर नवीन व मजबूत तोट्या बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला पाहिजे” या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर मागील आठ दिवसांत सुमारे ५०० हून अधिक नळांना नवीन तोट्या बसवण्यात आल्या असून त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

याशिवाय ज्या भागात पाणी कमी दाबाने येते किंवा तांत्रिक अडचणी आहेत, त्या त्वरित दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार बोअरवेल व पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.

“उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गळती रोखून प्रत्येक घरापर्यंत मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करणे हाच आमचा ध्यास आहे,” असे पाणीपुरवठा सभापती निलोफर निसार भाटी यांनी सांगितले.

प्रशासनाच्या या तत्पर कामगिरीमुळे किनवटकर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रत्यक्ष प्रभागात जाऊन समस्या सोडवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या मोहिमेमुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Tags: Sheikh Moien
Previous Post

वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

Next Post

पालममध्ये प्रथमच हिंदू महासंमेलन; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
97
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post

पालममध्ये प्रथमच हिंदू महासंमेलन; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In