• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

येवला/अंदरसुल | प्रतिनिधी:
राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र निदर्शने करण्यात आली. “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रतिक अशोकराव शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब अहिरे, जिल्हा सचिव ॲड. सिद्धार्थ अहिरे, युवा तालुका उपाध्यक्ष आशिष अहिरे, तालुका सचिव अमोल सोनवणे, संपर्क प्रमुख प्रेम शिंगाडे, माऊली जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

गेल्या काही महिन्यांपासून येवला तालुक्यासह ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना ४० ते ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गॅस एजन्सींकडे वारंवार चकरा मारूनही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना घेराव घालत प्रशासनाकडे जाब विचारला. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले.

प्रमुख मागण्या:

  • येवला तालुक्यातील गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा
  • काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी
  • गॅस रांगेतील अडवणूक व नागरिकांचा होणारा मानसिक छळ थांबवावा

“सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना गॅससाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा प्रतिक अशोकराव शिंदे यांनी दिला.

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

कडेगाव येथे भाजपचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Next Post

चोपडा तंत्रनिकेतनात कॅम्पस प्लेसमेंटची मोठी भरारी; ५१ विद्यार्थ्यांची निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
चोपडा तंत्रनिकेतनात कॅम्पस प्लेसमेंटची मोठी भरारी; ५१ विद्यार्थ्यांची निवड

चोपडा तंत्रनिकेतनात कॅम्पस प्लेसमेंटची मोठी भरारी; ५१ विद्यार्थ्यांची निवड

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In