• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूम नगरपरिषदेचा रस्ते घोटाळा न्यायालयाच्या रडारवर; ५० कोटींचे देयक रोखले, सरकारसह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : भूम नगरपरिषद क्षेत्रातील कथित रस्ते घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कडक भूमिका घेत संबंधित कंत्राटदाराला देण्यात येणारे सुमारे ५० कोटी रुपयांचे देयक तातडीने रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि राज्य शासनाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत जाब विचारला आहे.

७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्राथमिक पुराव्यांची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

नेमके प्रकरण काय?
अबासाहेब मस्कर, संताजी सुपेकर आणि चंद्रमणी गायकवाड या स्थानिक नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, भूम नगरपरिषदेने ९ जून २०२३ रोजी सुमारे ९५.६२ कोटी रुपयांची ई-निविदा काढून सिमेंट रस्ते व गटारींची कामे मंजूर केली होती.

याचिकेतील प्रमुख आरोप:
• आधीच चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांवर पुन्हा कामे दाखवून निधीचा अपव्यय
• जुन्या रस्त्यांचे केवळ नाव बदलून नवीन प्रस्ताव सादर
• शासनाला चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर
• लोकप्रतिनिधी नसलेल्या प्रशासकीय काळाचा गैरफायदा

याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे की, काही रस्ते अवघ्या ६ ते ८ महिन्यांपूर्वी किंवा २ वर्षांच्या आत पूर्ण झालेले असूनही त्यांच्यावर पुन्हा निधी खर्च करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

न्यायालयाचे निर्देश:
उच्च न्यायालयाने कंत्राटदाराचे ५० कोटी रुपये थांबवण्याचे आदेश दिले असून, संबंधित रस्त्यांसाठी पुन्हा निधी मंजूर कसा झाला याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

यापूर्वीही याचिकाकर्त्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. संभाजी टोपे व ॲड. गणेश कोरे यांनी बाजू मांडली असून शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंग गिरासे तर नगरपरिषद भूमच्या वतीने ॲड. विक्रम उंद्रे यांनी बाजू मांडली.

Tags: Asif Shaikh
Previous Post

रिसोड शहरात वंचित बहूजन आघाडीचे गॅस टंचाईविरोधात अनोखे आंदोलन

Next Post

बेल्लोरी येथील जिल्हा परिषद शाळेबाबत आग लागल्याची अफवा; शाळा पूर्णपणे सुरक्षित

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post
बेल्लोरी येथील जिल्हा परिषद शाळेबाबत आग लागल्याची अफवा; शाळा पूर्णपणे सुरक्षित

बेल्लोरी येथील जिल्हा परिषद शाळेबाबत आग लागल्याची अफवा; शाळा पूर्णपणे सुरक्षित

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In