• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in सरकारी योजना
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला मंगळवारी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) लाँचिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेकर असल्याने ते टीबीएमवर नजर ठेवतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

RelatedPosts

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

टिकुजिनीवाडी ते बोरीवली या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला टीबीएम मशिनद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी असून त्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवलीकडून ५.७५ किमी आणि ठाण्याकडून सुमारे ६.०९ किमी बोगदा खोदण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या लागणारा ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल.

या बोगद्यात दोन वाहतूक मार्ग असून प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत राबवण्यात येत असून मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून, तर अर्जुना हे झाडाच्या नावावरून देण्यात आले आहे. एकूण चार अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची टीबीएम यंत्रे या कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प संवेदनशील असून जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तोडण्यात आलेल्या सुमारे ११ हजार झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले. २०२४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. काही अडथळे आले होते, मात्र ते दूर करून प्रकल्पाला गती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची काळजी घेणे मोठे आव्हान होते, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून गेम चेंजर प्रकल्प ठरेल. रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी देत असल्याचेही ते म्हणाले.

Tags: Vinod Jagtap
Previous Post

रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

Next Post

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड

Related Posts

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट
प्रेस नोट

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

August 6, 2026
47
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…
सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

March 6, 2026
158
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
50
दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला
प्रशासन

दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला

September 27, 2025
51
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
प्रशासन

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

September 23, 2025
116
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
Blog

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

September 23, 2025
11
Next Post
उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In