• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

बोरद (प्रतिनिधी) : बोरद येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या निमित्ताने आयोजित विराट हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल हिंदू समाज व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन व पूजा-अर्चा यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी सुमारे चार वाजता राम मंदिरापासून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत गावातील युवक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, धार्मिक घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत आकर्षक सजवलेल्या वाहनावरती श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

सायंकाळी सहा वाजता जय योगेश्वर मंडप येथे कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आयोजित विराट हिंदू संमेलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

संत आशीर्वचनासाठी मा. श्री. कैलासजी महाराज उपस्थित होते. त्यांनी हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृतीचे जतन आणि समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले

विशेष अतिथी मा. श्री. जितेंद्रदादा पाडवी यांनी आपल्या भाषणात तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथील आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास उलगडून सांगितला. त्यांनी नमूद केले की, १९४३ साली रावलापाणी येथे ब्रिटिश सत्तेविरोधात आदिवासी बांधवांनी मोठा संघर्ष उभारला होता. या आंदोलनावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात अनेकांनी बलिदान दिले, ज्यामुळे रावलापानी हे आदिवासी क्रांतीचे प्रतीक बनले आहे.

“आरती पूजा ही हिंदू धर्मात दिलेली परंपरा आहे. संत गुलाब महाराज यांनी हिंदू समाज एकत्र राहावा यासाठी या परंपरांना चालना दिली. आदिवासी समाज वेगळा नसून तो हिंदूच आहे.” – मा. श्री. जितेंद्र दादा पाडवी (आप की जय परिवार प्रमुख, रंजनपूर)

यावेळी संत गुलाब महाराज व संत रामदास महाराज यांच्या कार्याचाही उल्लेख करण्यात आला. हिंदू समाज एकत्रित राहण्यासाठी त्यांनी दिलेले संदेश आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

मार्गदर्शक वक्ते मा. श्री. पुरुषोत्तमजी वसंत काळे यांनी हिंदू समाजातील एकता, सामाजिक समरसता आणि संस्कृतीचे जतन यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी संघटित राहून समाजकार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वी ठरला.

एकूणच, हनुमान जयंतीनिमित्त बोरद येथे पार पडलेले हे संमेलन धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवा जागृत करणारे ठरले. रावलापानीच्या क्रांतिकारक इतिहासाची आठवण आणि एकतेचा संदेश यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.

Ad 1
Previous Post

पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात

Next Post

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In