• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जिल्हाध्यक्षांचे काम चांगले असेल त्यांना पुन्हा संधी मिळणार! – राजेश तिवारी

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ स्तरावर जाणार असून जनतेच्या समस्या काय आहेत ? ते समजून घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक वाडी वस्ती आणि गाव तांडा या ठिकाणी पोचणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करतील. काँग्रेसचे जाळे सर्व स्तरावर मजबूत आहे. मात्र, भाजपने ईडी, सीबीआय व एसआयआर आदींची भीती दाखवण्यासह लालच दाखवून तसेच जाती धर्माच्या नावावर भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करत आहे. मात्र जनता काँग्रेस सोबत असून आगामी काळात जनताच केंद्रातील मोदी सरकारला मुळासकट उखडून फेकणार असल्याचा ठाम दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेश प्रभारी तथा धाराशिव प्रभारी राजेश तिवारी यांनी करीत केंद्रातील भाजप सरकारवर दि.११ एप्रिल रोजी हल्लाबोल केला..

धाराशिव शहरातील जिल्हा रुग्णालय शेजारील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे संघटन सृजन अभियान संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव निरिक्षक हेमंत ओगले, प्रदेश महासचिव तथा धाराशिव निरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड,
प्रदेश सचिव उदयसिंग पाटील, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, विनोद वीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभर केली. ही यात्रा ६ हजार किलो मीटरपेक्षा जास्त करण्यात आली असून या माध्यमातून खा गांधी यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगड येथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एससी, एसटी व ओबीसी या वर्गातील नेतृत्वास ५० टक्के नेतृत्व करण्याचा ठराव पारित केला आहे. ..

त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या काय समस्या आहेत. त्यासंदर्भात सरकार दरबारी आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा, तालुका, गट बूथ स्तरावर जाऊन जनतेचे मत जाणून घेण्यात येणार आहे. यादरम्यान सर्वसामान्य जनता जे मत नोंदविल त्याचा अहवाल दि.१९ एप्रिलपर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे सादर केला जाणार आहे. यामध्ये ५० वर्षावरील व युवक कार्यकर्त्यांना काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांना देखील संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून युवक वर्गाला काम करण्याची संधी आणि जबाबदारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या जिल्हाध्यक्षांचे काम जनतेशी जोडलेले असेल आणि जनतेने त्यांच्या कामावर पसंती दिली तर त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू असून या बांधणीमध्ये अशा अनुभवी जिल्हाध्यक्षाचा पक्षाच्या वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, १९ एप्रिलपर्य यासंदर्भात थेट जनसेशी संवाद केला जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

तांदळ्याच्या भूमिपुत्राची पुणे पोलिसात निवड; गावासह पुण्यात जल्लोष

Next Post

गौण खनिज उत्खननावर शासनाचा कडक निर्णय; बेकायदेशीर उत्खननावर फौजदारी कारवाईचे आदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
12
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
26
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post

गौण खनिज उत्खननावर शासनाचा कडक निर्णय; बेकायदेशीर उत्खननावर फौजदारी कारवाईचे आदेश

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In