• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधले; राजेमहाराजांनी राजवाडे, राजमहाल, शिशमहाल, सोनेरी महाल तर कोणी सोन्याच्या विटांनी कलाकृती साकारल्या. पण, जगातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते.

राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,००० हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला. राजगृहात मराठी व इंग्रजी पुस्तकांबरोबर गुजराथी, उर्दू, फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५० हजारांच्या जवळपास ग्रंथ असतील. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३ हजार, इतिहासावर २ हजार ६००, कायद्यावर आधारित ५ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार, चरित्रे १ हजार २००, इतर साहित्य ३ हजार, अर्थशास्त्र १ हजार, तत्व ज्ञान ६ हजार, युद्धशास्त्र ३ हजार व इतर ७ हजार ९०० इतिहासाची पाने चाळताना राजे महाराजांनी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर बांधतो. मात्र, ग्रंथांना जीव की प्राण मानणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वत:चे राजगृह बांधले, पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता. बाबासाहेब परदेशात शिकायला होते, तेव्हा त्यांच्याकडे पुस्तके खरेदीसाठी पैसे नसत. तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन ग्रंथालय जितका वेळ उघडं असेल तितका वेळ ते तिथे पुस्तके वाचत बसत. लंडन ते मुंबई अशा सलग ६४ तासाच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी ८ हजार पाने वाचून काढली होती. देवी दयाल लिखित ‘डेली रुटीन ऑफ डॉ. आंबेडकर’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

बाबासाहेब एकदा म्हणाले होते, “तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक.

कारण, भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल. आपल्या अभ्यासात बाबासाहेबांना व्यत्यय अजिबात आवडत नसे. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी १४ दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतः ला कोंडून घेतले होते. एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती. पण, ती बोट दुर्दैवाने बुडाली. जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते.

एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते.

पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितला होता. यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. कारण, ‘आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे.’ असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके त्यांचे पुस्तकांवर प्रेम होते.

लोकांनी माझी अवहेलना केली, पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं. म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे. पुस्तक हेच माझे मित्र आहेत असे बाबासाहेब नेहमी आवर्जून सांगत असत. पुस्तकांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संबंधी पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंथ क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली.

ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्कमधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, ही पुस्तकांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम, न्यूयार्क, इंग्लंड, अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते.

शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधले; राजेमहाराजांनी राजवाडे, राजमहाल, शिशमहाल, सोनेरी महाल तर कोणी सोन्याच्या विटांनी कलाकृती साकारल्या. पण, जगातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी जागा कमी पडू नये यासाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते.

अशा थोर महामानवास विनम्र अभिवादन..

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

शहादा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘भीम’ गर्जनेने अवघे शहर दुमदुमले

Next Post

बोरामणी येथे नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतुक

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

बोरामणी येथे नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतुक

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In