• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा,दि.15 (का.प्र.)
नंदुरबार जिल्हा काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी आणि संघटनेला नवी उभारी देण्यासाठी ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत बुधवारी शहादा येथे भव्य मेळावा उत्साहात पार पडला. गेल्या सहा वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल 24 जणांनी आपली दावेदारी सादर केली असून, लवकरच जिल्ह्याला नवा ‘कॅप्टन’ मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला


बालेकिल्ल्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान-
एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असलेला नंदुरबार जिल्हा 2014 नंतर राजकीय स्थित्यंतरामुळे कमकुवत झाला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींपासून गांधी परिवाराचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मात्र, आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त होते. सध्या आमदार शिरीष नाईक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता ‘संघटन सृजन अभियान’च्या माध्यमातून पक्षाने पुन्हा एकदा बांधणी सुरू केली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन-
शहादा येथील मिरा प्रताप लॉन्स बायपास रस्ता येथे आयोजित या मेळाव्यात प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते.अनिल पाटील (प्रदेश निरीक्षक व पंचायत राज समन्वयक),शिवाजीराव मोघे (माजी मंत्री),दिलीप नाईक (नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष),राजेंद्र गावित,सुहास नाईक (माजी उपाध्यक्ष, जि.प.),निलेश पाटील (जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष),देवा चौधरी(किसान सेल अध्यक्ष) आणि जावेद फारुख यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपकभाई पटेल यांनी केले.


जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 जण शर्यतीत-
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी मोठी असून यात अनुभवी आणि युवा चेहऱ्यांचा समावेश आहे. प्रमुख इच्छुकांमध्ये राजेंद्रकुमार गावित, दीपकभाई पटेल, सुहास नाईक, पंडितराव पवार, खंडेराव पवार, सुरेश साळुंखे, दत्तू पवार, सचिन रहासे, विश्वनाथ वळवी, अशोकराव पाटील, राकेश पावरा, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, अशोक वळवी, रोशन गावित, कश्मिरा बोरसे, मोहम्मद अ. सहमद, हारून इस्माईल खान, ऍड. जोमीखान पठाण, दिलीप नाईक, देवाभाई चौधरी आणि निखिल रघुवंशी यांचा समावेश आहे.
पुढील 15 दिवसांत घोषणा?-
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व इच्छुकांच्या मुलाखती आता दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पार पडणार आहेत. त्यानंतर येत्या 15 दिवसांत जिल्ह्यासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन

Next Post

रिठद येथे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न व महाप्रसाद वितरण

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post

रिठद येथे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न व महाप्रसाद वितरण

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In