• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा; संस्कार महाराजांचे प्रबोधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जत / प्रतिनिधी.

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

ज्यांनी ज्यांनी भगवंताला जवळ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली हे जरी खरे असलेतरी शेवटी त्यांना भगवंत भेटलेच व भगवंत भेटीने त्यांचे जिवन धन्य झाले असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तन व प्रबोधनकार ह. भ. प. श्री. संस्कार महाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांनी केले.

ते येथील छत्रपती शिवाजीराजे नगर येथील श्री. स्वामीसमर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने श्री. स्वामीसमर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात प्रबोधन करीत होते.
श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या, १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री. स्वामी समर्थ मंदिरावर आकर्षक अशी विधुत रोषनाई करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला होता.

पुण्यतिथीनिमित्त श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभ्यंग स्नान घालून अभिषेक पूजा व आरती करण्यात आली.

त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तन व प्रभोधनकार ह. भ. प. श्री.संस्कार महाराज खंडागळे यांच्या कीर्तनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रबोधन करताना महाराज पुढे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत होऊन गेले. त्यांनी आपला संसार सोडून परमात्म्याच्या भेटीच्या ओढीने जगनिंदा सहन केली.

जगतगुरू श्री. संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर,संत सखुबाई, संत चॊकामेळा,संत मीराबाई, संत जनाबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदी संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी जगनिंदा सहन केली त्यानंतरच त्यांची आणी भगवंतांची भेट झाली असेही महाराज म्हणाले.

श्री. स्वामी समर्थ महाराज हे देह सोडून जरी गेले असलेतरी भक्तांच्या हाकेला ते धावून येतात याची प्रचिती अनेक भक्तांना येत असून आपले जे काही आहे ते सर्व काही आपले नसून ते स्वामींचे आहें अशी भावना ज्या भक्तांची आहे. अशा भक्तांच्या आयुष्यात स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत त्यामुळे सर्वांनी स्वामी नामाचा गजर केला पाहिजे असेही महाराज म्हणाले.

श्री. स्वामी समर्थ चारिटेबल ट्रस्ट जत हे विविध उपक्रम राबवित असून या ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच वारकरी शिक्षण संस्था व अन्नछत्र व सभागृह बांधण्यात येणार असून या पवित्र कार्यास स्वामी भक्तांनी व समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन ही संस्कार महाराज यांनी केले.
दुपारी एक वाजता श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रींची आरती होऊन श्री. स्वामी चरणी पुष्प अर्पण करण्यात येऊन त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या वेळी शशिकांत काळगी, इंजि. विश्वनाथ शिंदे, माजी प्राचार्य वसंतराव बोराडे,सुभाष हातेकर( सांगोला ), दिनराज वाघमारे,प्रतीक अंकलगी,आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, शहाजीबापू भोसले, सतीश चव्हाण ( मिस्त्री ),अतुल मोरे,दीपक पाटणकर, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, गणेश सावंत, मोहन पवार, समर्थ पवार,सदाशिव जाधव आदींनी सहकार्य केले.

पुण्यतिथी निमित्त पहाटेपासूनच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी दिसून येत होती यामुळे संपूर्ण परिसर स्वामीमय झाला होता.

Ad 1
Tags: Arun Koli
Previous Post

जत : पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

Next Post

कामचुकारपणा सहन केला जाणार नाही” – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा कन्नडमध्ये इशारा

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
25
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post
कामचुकारपणा सहन केला जाणार नाही” – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा कन्नडमध्ये इशारा

कामचुकारपणा सहन केला जाणार नाही” – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा कन्नडमध्ये इशारा

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In