• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी)

पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह’ सुरू करण्याच्या मागणीला अखेर प्रशासकीय स्तरावर सकारात्मक गती मिळाली आहे. संकल्प मानव विकास संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत परभणी समाज कल्याण विभागाने संबंधित प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पुणे येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

पाथरी व मानवत परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दरवर्षी ऊसतोडणी हंगामात कुटुंबांसह स्थलांतर करावे लागते. त्यामुळे या कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊन अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शाळा सोडण्याची वेळ येते. या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून पाथरी शहरात शासकीय वसतिगृहाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर व पदाधिकाऱ्यांनी ३० मार्च २०२६ रोजी सविस्तर निवेदन सादर करून वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय परभणी यांनी अधिकृत पत्राद्वारे संबंधित महामंडळाकडे प्रस्ताव पाठवून पाथरीसाठी वसतिगृह मंजूर करण्याची शिफारस केली आहे.

परभणी जिल्ह्यातील इतर तीन तालुक्यांमध्ये अशा प्रकारची वसतिगृहे कार्यरत असल्याने पाथरी तालुक्याचाही त्यात समावेश व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्थिर शैक्षणिक वातावरण मिळून त्यांच्या शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यात समाधानाचे वातावरण असून, या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संकल्प मानव विकास संस्थेकडून पुढील स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

पाथरीत तापमानाचा पारा चढला; उष्माघाताचा धोका वाढला, नागरिकांनी घ्यावी काळजी

Next Post

जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद

जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In