• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाळकीत दिव्यांगांना उत्पन्न दाखल्यासाठी संघर्ष; तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने तात्काळ दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

दौंड (प्रतिनिधी) :
दौंड तालुक्यातील वाळकी येथे दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब उघडकीस आली. तलाठी कार्यालयाकडून ५० हजार रुपयांखालील उत्पन्नाचा दाखला देण्यास नकार दिला जात होता. कुटुंबातील सदस्यसंख्या अधिक असल्याचे कारण पुढे करत हा दाखला नाकारण्यात येत असल्याने अनेक दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत होते.

दिव्यांगांचा संताप; तलाठी कार्यालयात जाब विचारणा

या पार्श्वभूमीवर वाळकी गावातील दिव्यांग बांधव एकत्र येत तलाठी कार्यालयात गेले. सोपान हनुमंत थोरात आणि अशोक ज्ञानोबा थोरात यांना उत्पन्नाचा दाखला नाकारल्याबद्दल तलाठ्यांना जाब विचारण्यात आला. मात्र शासन निर्णयाचा आधार देत प्रशासनाने भूमिका कायम ठेवली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

प्रहार संघटनेचे आंदोलन

प्रकरण चिघळल्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. दिव्यांगांनी आपला आक्रोश व्यक्त करत तलाठी कार्यालय बंद करून निषेध नोंदवला. “वारंवार हेलपाटे मारूनही दाखला मिळत नसेल, तर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा देण्यात आला.

संघटनेचा पाठिंबा

स्थानिक अध्यक्ष सोमनाथ लवांडे यांनी संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी “दिव्यांगांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, पूर्ण ताकदीने लढा,” असा ठाम पाठिंबा संघटनेकडून देण्यात आला.

तहसीलदारांचा तात्काळ हस्तक्षेप

सदर प्रकरण तहसीलदार अरुण शेलार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. लाभार्थ्यांकडे अल्प जमीन क्षेत्र असल्यामुळे दाखला नाकारला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर तहसीलदारांनी तात्काळ हस्तक्षेप करत तलाठ्यांना लेखी अर्ज स्वीकारून संबंधित दिव्यांगांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्याचे आदेश दिले.

दिव्यांगांना दिलासा

तहसीलदारांच्या आदेशानंतर संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले. या वेळी तलाठी मोतीबोने, पोलीस पाटील निळकंठ थोरात, पत्रकार विठ्ठलदादा थोरात, माजी सोसायटी चेअरमन गणेश थोरात तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेमुळे प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्यास नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Previous Post

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत देशमुख कुटुंबात थेट लढत; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

Next Post

गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पाहणी; दर्जेदार कामावर भर

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पाहणी; दर्जेदार कामावर भर

गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पाहणी; दर्जेदार कामावर भर

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In