• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृष्णा-भीमा प्रकल्पात जामखेडचा समावेश करण्याची मागणी; चोंडी येथे निवेदन सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृष्णा-भीमा प्रकल्पात जामखेडचा समावेश करण्याची मागणी; चोंडी येथे निवेदन सादर
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) :
दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्याचा कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्प मध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी चोंडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे माजी संचालक करण अंकुशराव ढवळे यांनी सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले.

दुष्काळामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले

जामखेड तालुक्यात पाटपाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. परिणामी रोजगारासाठी सुमारे २८ टक्के स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेजारील आष्टी, भूम-परांडा तालुक्यांना प्रकल्पाचे पाणी मिळत असताना जामखेड मात्र अद्याप वंचित आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

५० वर्षांपासून पाण्याची मागणी कायम

तालुक्याला कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळावे, यासाठी गेल्या पाच दशकांपासून विविध आंदोलने करण्यात आली आहेत. उपोषण, जेलभरो, मोर्चे तसेच आझाद मैदान येथे आंदोलन करूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही. मात्र ही मागणी सातत्याने जिवंत ठेवण्यात आली आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी

२००४ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पातून कृष्णा खोऱ्यातील विविध नद्यांमधून एकूण ११५ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी ६३ टीएमसी पाणी भिमा नदीवरील उजनी धरणात सोडण्यात येणार असून, काही भाग मराठवाड्यातील आष्टी, पाटोदा, भूम, परांडा व धाराशिव तालुक्यांना दिले जाणार आहे. मात्र, कृष्णा खोऱ्यातील असूनही जामखेड तालुका या लाभक्षेत्राबाहेर राहिला आहे.

पूर्वीही शासनाकडे पाठपुरावा

सभापती राम शिंदे यांनी १९ मे २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी मांडली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने ६ जून २०२४ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता.

फडणवीसांचे आश्वासन

जामखेडमधील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी ‘कृष्णा फ्लड डायवर्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून जामखेडला पाणी देता येईल का, याची पडताळणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

जामखेड तालुक्याचा या प्रकल्पात समावेश झाल्यास दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Amrut Karande
Previous Post

आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ; पालकांनी त्वरित अर्ज भरावेत

Next Post

निखील पिंगळे सातारचे नवे पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची सांगलीला बदली

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
निखील पिंगळे सातारचे नवे पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची सांगलीला बदली

निखील पिंगळे सातारचे नवे पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची सांगलीला बदली

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In