• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारत कवितके ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मानित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
भारत कवितके ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मानित
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मुंबई, कांदिवली (प्रतिनिधी) :
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

हा राज्यस्तरीय पुरस्कार समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट यांच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

भारत कवितके यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांच्या ‘सांज’, ‘शोधतो मी किनारा’, ‘आकाश तारकांचे’, ‘अरे मी एकटा’, ‘मी एक वृत्तपत्र लेखक’, ‘माझ्या गावाच्या दिशेने’, ‘मनातल्या चारोळ्या’, ‘चांदण्यांना रोज सांगतो’ अशा एकूण नऊ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. तसेच ‘इश्कात रात रंगली’ हा लावणी संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.

संगीत व साहित्य क्षेत्रातही सक्रिय

त्यांच्या १६ गाण्यांचे युट्यूबवर प्रकाशन झाले असून रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

११६८ पुरस्कारांनी सन्मानित

भारत कवितके यांना आतापर्यंत तब्बल ११६८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथेही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांच्या बातम्या, लेख, कविता, कथा आणि चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास मिनाक्षी पाखरे, अलका नाईक, अशोक मोहिते, रामकृष्ण कोळवणकर, रावसाहेब घोडेराव, मंगेश नाईक, संगीता वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप रासकर यांनी प्रभावी आणि मनोरंजक सूत्रसंचालन केले.

या पुरस्कारामुळे भारत कवितके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Tags: Bharat kavitake
Previous Post

कांदिवलीत ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ सोहळा जल्लोषात संपन्न

Next Post

संघर्षातून उभा राहिलेला यशाचा क्षण; TISS पदवीदान सोहळ्यात कुणाल राऊत यांचा सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
संघर्षातून उभा राहिलेला यशाचा क्षण; TISS पदवीदान सोहळ्यात कुणाल राऊत यांचा सन्मान

संघर्षातून उभा राहिलेला यशाचा क्षण; TISS पदवीदान सोहळ्यात कुणाल राऊत यांचा सन्मान

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In