• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ सोहळा जल्लोषात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवलीत ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ सोहळा जल्लोषात संपन्न
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

मुंबई, कांदिवली (प्रतिनिधी) :
समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात पार पडला. अक्षय तृतीया निमित्त रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

संस्थेच्या कार्याचा आढावा

ट्रस्टच्या अध्यक्षा मिनाक्षी पाखरे यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देताना सांगितले की, “संस्था स्थापनेपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने कार्य केले. शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आदिवासी पाड्यांमध्ये सामाजिक उपक्रम, तसेच महिलांसाठी विविध योजना राबवून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर संस्था कार्यरत आहे.”

मान्यवरांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या उद्घाटक अलका नाईक यांनी पुरस्कार हे कार्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे सांगत कविता सादर केल्या. यावेळी रामकृष्ण कोळवणकर, अशोक मोहिते, रावसाहेब घोडेराव यांनीही मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक मंगेश नाईक यांनी २६/११ मुंबई हल्ले मधील अनुभव कथन करून उपस्थितांना भावूक केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

कार्यक्रमात गणेश आरती, लावणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा यांच्या वेशभूषेतील सादरीकरणांसह चित्रपट गीतांचे कार्यक्रम सादर करण्यात आले. संदीप रासकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

पुरस्कार वितरण

स्नेहभोजनानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक व गीतकार भारत कवितके यांना ‘साहित्य रत्न पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सुनिता क्षीरसागर, ‘आम्ही मुंबईकर’चे संपादक प्रमोद सूर्यवंशी, अनिता जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘विकासरत्न प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

एकूणच हा सोहळा उत्साह, सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम ठरला.

Tags: Bharat kavitake
Previous Post

जळकोट तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा; फळबागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Next Post

भारत कवितके ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मानित

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
भारत कवितके ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मानित

भारत कवितके ‘साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मानित

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In