• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा इमारत दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईची मागणी; शिवसेना (उ.बा.ठा.)चे तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा इमारत दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईची मागणी; शिवसेना (उ.बा.ठा.)चे तहसीलदारांना निवेदन
0
SHARES
93
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) – आजरा शहरात जुनी इमारत पाडताना घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन निष्पाप जीव गमावल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

दि. २० एप्रिल २०२६ रोजी आजरा शहरात एका जुन्या इमारतीची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिला प्राध्यापिका आणि एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाला थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. संबंधित इमारत पाडण्यापूर्वी नगरपंचायतीची परवानगी घेतली होती का, कामादरम्यान कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, तसेच नगरपंचायतीने देखरेखीत कोणती दक्षता घेतली होती का, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

दोन निष्पाप नागरिकांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांची सखोल चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या वेळी शहरप्रमुख समीर चाँद, सागर नाईक, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, उपतालुका प्रमुख संजय येसादे, अमित गुरव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In