• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी):
मानवत येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, शाखा क्रमांक १ येथे दि. २३ एप्रिल रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंशासन दिन’ तसेच मुख्याध्यापिका जरीना शेख यांच्या निरोप समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मोहम्मद बदरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अध्यक्षस्थानी पाथरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुजीब अन्सारी होते, तर नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान, डॉ. आहद बेलदार, डॉ. जुबेर खान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भूमिका स्वीकारत शाळेचे दैनंदिन कामकाज जबाबदारीने सांभाळले. विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता व जबाबदारीची जाणीव विकसित होत असल्याचे दिसून आले.

यानंतर मुख्याध्यापिका जरीना शेख यांच्या निरोप समारंभात त्यांच्या सेवाकाळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही भावनिक वातावरणात आपल्या भावना व्यक्त करत त्यांना निरोप दिला.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत परिश्रम, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुजीब अन्सारी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऐहतेसार अन्सारी, रिजवानुद्दीन, बद्रुद्दीन, निखत मॅडम, अन्सारी इशरत फातेमा यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रिजवानुद्दीन यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऐहतेसार अन्सारी यांनी मानले.

नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असे मत व्यक्त केले.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

Next Post

ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

ॲड. मुकुंद पाटील यांची 'पॅनल विधीज्ञ' व 'रिटेनर विधीज्ञ' पदी निवड

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In