• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांधकाम कामगारांची फसवणूक उघड; फॉर्ममध्ये मुद्दाम चुका करून पैशांची उकळपट्टी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
बांधकाम कामगारांची फसवणूक उघड; फॉर्ममध्ये मुद्दाम चुका करून पैशांची उकळपट्टी
0
SHARES
183
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी दलाल आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केला आहे. रावेर, जामनेर, अमळनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील कामगारांना नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यातून आर्थिक शोषण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

माहितीनुसार, कामगारांची नोंदणी दलालांमार्फत केली जात असून प्रत्येकाकडून ₹1000 ते ₹2000 पर्यंत अवैध वसुली केली जाते. याहून गंभीर बाब म्हणजे फॉर्म भरताना मोबाईल क्रमांक, आधार, बँक खाते व वारसांची नावे यामध्ये जाणूनबुजून चुका केल्या जातात. नंतर या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पैसे उकळले जातात. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही साध्या दुरुस्तीसाठी 5 ते 6 महिने लागतात, तर दलालांना ₹500 ते ₹800 दिल्यास अवघ्या 10 मिनिटांत काम पूर्ण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शासनाने तालुका स्तरावर सुविधा केंद्रे उभारून कर्मचारी नेमले असतानाही कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांना वारंवार जळगाव येथे फेऱ्या माराव्या लागत आहेत. परिणामी अनेक कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित राहिल्या असून चुकीच्या माहितीमुळे शासकीय योजनांचा लाभ अडकून पडला आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावरच दुरुस्तीचे अधिकार देणे, दलालांविरोधात कठोर कारवाई करणे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणे, प्रक्रियेला निश्चित कालमर्यादा देणे व संपूर्ण यंत्रणा पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, मंडळाच्या सचिवांच्या निषेधार्थ त्यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालण्याचाही इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: dnyaneshwar sawle
Previous Post

धानोरा गावच्या प्रथम सुनबाईची पोलिस दलात भरारी; पुनम मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाईपदी निवड

Next Post

जनार्धन वाघमारे यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
जनार्धन वाघमारे यांचे निधन

जनार्धन वाघमारे यांचे निधन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In