धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) : धाराशिव नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी जनार्धन माधवराव वाघमारे (वय ७१, रा. भीमनगर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार, २४ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते येथील कवयित्री तथा शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील परिचारिका भाग्यश्री वाघमारे-केसकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर रात्री ८ वाजता बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाघमारे कुटुंबीयांचे नातेवाईक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









