• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाशिम जिल्ह्यात कामगार कल्याण योजनेचा बोजवारा; मजुरांमध्ये तीव्र संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत मजुरांसाठी शासनाने ३० भांड्यांचा स्टील संच मोफत देण्याची योजना सुरू केली असली, तरी वाशिम जिल्ह्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रत्यक्ष भांडी वाटप करण्याऐवजी लाभार्थ्यांना भांड्यांसमोर उभे करून केवळ फोटो काढले जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अनसिंग येथील केंद्रावर ही योजना प्रत्यक्षात राबवली जात आहे की केवळ कागदोपत्री आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत मजुरांची थट्टा होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लाभार्थ्यांना भांड्यांसोबत उभे करून फोटो घेतले जात असले तरी प्रत्यक्षात साहित्य वाटप होत नसल्याने मजूर रिकाम्या हाताने परतत असल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

याशिवाय, उन्हाच्या वाढत्या तीव्रतेतही केंद्रावर पिण्याच्या पाण्याची किंवा बसण्याची कोणतीही सोय नसल्याने मजुरांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मजुरी सोडून आलेल्या कामगारांना दिवसभर उपाशीपोटी थांबावे लागत असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

साहित्य उपलब्ध असूनही वाटपात टाळाटाळ का केली जात आहे, यामागे कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच मजुरांना त्यांच्या हक्काचा ३० भांड्यांचा संच त्वरित वितरित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा कामगारांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Previous Post

रिसोड सिव्हिल लाईन परिसरात पथदिव्यांचा प्रकाश; नागरिकांच्या एकजुटीला यश

Next Post

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In