• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

अतनूर (प्रतिनिधी) : “डंख छोटा असला तरी त्याचा धोका मोठा असतो. हिवतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांसोबतच जनतेचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख यांनी केले. त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती कोळळे यांनीही दुजोरा दिला.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ अतनूर येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत २८ गावे, वाडी, तांडे व वस्त्यांमध्ये तसेच पाच उपकेंद्रांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. गावातील प्रमुख चौक, बसस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणी रॅली काढून नागरिकांना हिवताप (मलेरिया) या आजाराबाबत जागरूक करण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्त्या तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला. “मलेरिया डास आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो,” याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन साचलेल्या पाण्याची तपासणी केली. ज्या ठिकाणी डासांची अळी आढळली, त्या पाण्यात कीटकनाशक औषध टाकण्यात आले. तसेच नागरिकांना आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता राखणे, साचलेले पाणी टाळणे आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करणे याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.

या जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, निरोगी समाज घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Previous Post

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

Next Post

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In