• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्रात पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात आलेली २१ वी पशुगणना फेब्रुवारी २०२५ मध्ये यशस्वीरित्या पार पडली. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत ही गणना पूर्ण करण्यात आली होती. या कामासाठी विभागाकडून प्रगणक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या पशुगणनेदरम्यान प्रगणकांना शहरी भागातील प्रत्येक कुटुंबामागे ९ रुपये तर ग्रामीण भागात १० रुपये मानधन देण्याचे तसेच ऑनलाईन माहिती भरण्यासाठी अतिरिक्त मोबदला देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही प्रगणकांना केवळ मोबाईल खर्चाचे बिल मिळाले असून मूळ मानधन अद्यापही मिळालेले नाही.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

प्रगणकांनी याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, “मानधन केंद्र शासनाकडून येते, ते कधी मिळेल याबाबत निश्चित माहिती नाही,” असे उत्तर दिले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यभरातील प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या धोरणामुळे भविष्यात पशुगणना करण्यासाठी प्रगणक मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रगणकांनी सुरुवातीला काम करण्यास अनिच्छा दर्शवली होती, मात्र स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी काम स्वीकारले. आता मात्र मानधन रखडल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे.

पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांनाच उपचार व लसीकरणाची कामे थांबवून पशुगणनेचे काम करावे लागेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, प्रगणकांनी शासनाने तात्काळ दखल घेऊन रखडलेले मानधन वितरित करावे, अशी मागणी केली आहे.

Previous Post

दरेगावमध्ये ‘महा जल योजना’ कासवगतीने; पाणीटंचाई कायम, ग्रामस्थांची नाराजी

Next Post

कराड एसटी आगारात महिलांकडून शौचालयासाठी शुल्क; आदेशानंतरही वसुली सुरू, नागरिक संतप्त

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

कराड एसटी आगारात महिलांकडून शौचालयासाठी शुल्क; आदेशानंतरही वसुली सुरू, नागरिक संतप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In