• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष; कामगार संघटनेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
607
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी (02 मे 2026)

राज्यभरातील वीज कंत्राटी कामगारांच्या गंभीर समस्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने केला आहे. यासंदर्भात संघटनेने संपादकांकडे निवेदन देत प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

महावितरणने राज्यातील 329 सबस्टेशनमध्ये 1316 कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यासाठी क्रिस्टल व स्मार्ट सर्विसेस या एजन्सींना कंत्राट दिले होते. मात्र, निविदेनुसार आवश्यक कामगार न पुरवता, अनेक कामगारांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून वेतन दिले गेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने कामगार आयुक्त, मुंबई (बांद्रा) कार्यालयात तक्रार दाखल केली होती. 26 फेब्रुवारी व 27 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कामगार उपायुक्त लक्ष्मण भुजबळ यांनी महावितरणला आदेश दिले होते. मात्र, अद्यापही त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले की, “महावितरणने आजपर्यंत संघटना, कंत्राटदार व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतलेली नाही. निविदेनुसार कामगार भरती न करणे, थकीत वेतन न देणे आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब आहे.”

निविदेनुसार प्रत्येक सबस्टेशनवर 4 ऑपरेटर, 1 सफाई कामगार व 1 सुरक्षा रक्षक नियुक्त करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही अट पाळली जात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी इशारा दिला की, “15 मेपर्यंत कामगार उपायुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करून संयुक्त बैठक आयोजित न केल्यास आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास 18 मेपासून राज्यभरातील 1316 कामगार कामबंद आंदोलन करतील. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.”

या प्रकरणामुळे राज्यातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Tags: Karan Bharti
Previous Post

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

Next Post

गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In