• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेती माफियांचा उच्छाद! ५ दिवसांपासून उपोषण सुरू, तरीही प्रशासन ढिम्म; आता थेट आत्मदहनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

​देगलूर | विशेष प्रतिनिधी :
बिलोली-देगलूर परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा आणि आंतरराज्यीय तस्करीने आता उग्र रूप धारण केले आहे. गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने संतप्त झालेले मनसेचे तालुकाध्यक्ष मनमथ सूर्यकांत परबते यांनी आता ‘कारवाई करा, नाहीतर जीव देऊ’ असा आक्रमक पवित्रा घेतला आहे . विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे .


​नेमके प्रकरण काय?
​महाराष्ट्र-तेलंगणा-कर्नाटक या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात हायवा गाड्यांद्वारे अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गाड्या क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) भरल्या जात असून, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, प्रशासनाचे रेती माफियांशी साटेलोटे आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
​उपोषणाचा पाचवा दिवस,

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

प्रकृतीकडे दुर्लक्ष?
​मनमथ परबते गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, अद्याप एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन ठोस आश्वासन दिलेले नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे रेती माफियांचे मनोबल अधिकच वाढले असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


​ आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
​हायवा गाड्यांची चौकशी: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या सर्व हायवा गाड्यांची सखोल चौकशी व्हावी.
​ब्लॅकलिस्टची कारवाई: नियम मोडणाऱ्या वाहनांना कायमस्वरूपी काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
​दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार: रेती माफियांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने विभागीय कारवाई करण्यात यावी.
​ शाश्वत बंदी : सीमावर्ती भागातील अवैध रेती वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.


​प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम
​विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात परबते यांनी स्पष्ट केले आहे की, जर येणाऱ्या काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. या संभाव्य घटनेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


​” प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. रेती उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि महसूलही बुडत आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत *मी माघार घेणार नाही.”
— *मनमथ सूर्यकांत परबते ( तालुकाध्यक्ष, मनसे )


​ आता या गंभीर इशाऱ्यानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होणार का? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

Previous Post

वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली

Next Post

पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
9
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध

पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In