• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in Blog
0
शिरूर नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
0
SHARES
116
VIEWS
Ad 1

शिरूर (पुणे) | प्रतिनिधी :
महाराष्ट्र दिनानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या प्रांगणात देशभक्तीपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी शाळा क्रमांक ५ मधील शिक्षक व विद्यार्थिनींनी सादर केलेले वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत यामुळे परिसर देशभक्तीने भारावून गेला. उपस्थित सर्व मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत अभिवादन केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी एकजुटीने शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनीही प्रशासनाच्या विविध योजनांची माहिती देत शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व सांगितले. उपनगराध्यक्ष मितेश गादीया यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व नगरसेविका यांचा नगराध्यक्षा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कामगार दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

तसेच पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा सभापती तथा नगरसेविका डॉ. सुनीता पोटे यांचा महिलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सेल्फी पॉइंटवर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे फोटो काढत सोहळ्याचा आनंद लुटला.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दुहेरी औचित्याने आयोजित या कार्यक्रमातून देशभक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात उज्ज्वल कामगिरी कायम

Next Post

जनगणना-२०२७ अनुषंगाने रिसोड नगरपरिषदेत लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

जनगणना-२०२७ अनुषंगाने रिसोड नगरपरिषदेत लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In