• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

मंठा, जि. जालना (प्रतिनिधी) : ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून न दिल्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर (दि. १ मे) हे आंदोलन छेडण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निवेदनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, मंठा तालुक्यातील काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचा गंभीर प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाला पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातले जात असल्याचाही आरोप करण्यात आला.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ आणि भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असताना देखील प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभे राहिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडने प्रशासनास अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आंदोलन सध्या शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

निगडीतील माई सेवा केंद्रात गर्दीचा भडका; बंदमुळे नागरिक त्रस्त

Next Post

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In