• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी; आदिवासी संघटनांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in Blog
0
नंदुरबारमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी; आदिवासी संघटनांचे निवेदन
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

अक्राणी (प्रतिनिधी) – दि. ५ मे २०२६

नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी ठाम मागणी विविध आदिवासी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना आदी संघटनांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, कार्याध्यक्ष रविंद्र वळवी, महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुका अध्यक्ष अजय वळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (शहादा), गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची मागणी करण्यात आली आहे.

संघटनांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही पोलिस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून, निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करणे, तसेच पत्रकारांवर दबाव टाकणे असे प्रकार घडत आहेत. याशिवाय अवैध धंद्यांना संरक्षण दिल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढीस लागल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील गुन्हेगारीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा संघटनांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यास परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

Next Post

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
107
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In