• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

बीड प्रतिनिधी – शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक झाला आहे. रुग्णालयातील गैरसोयींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान मोरे आणि उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान रुग्णालयातील अनेक वार्डमध्ये फॅन बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. कडाक्याच्या उन्हामुळे रुग्णांचे हाल होत असून पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. तसेच रुग्णालयात कुलर असला तरी त्याचा लाभ मोजक्याच रुग्णांना मिळत असल्याची तक्रार करण्यात आली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

रात्री डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून मच्छर अगरबत्ती किंवा प्रतिबंधात्मक साधनांचीही व्यवस्था नसल्याने रुग्णांना झोपणे कठीण होत असल्याचे समोर आले. प्रथमोपचारासाठीही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

“रुग्णालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी येतो, मग तो खर्च कुठे होतो?” असा सवाल सोपान मोरे आणि आजिनाथ खेडकर यांनी उपस्थित केला. रायमोहा परिसरातील ८ ते १२ वाड्यांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हासभैया गिराम यांच्या आदेशानुसार ही पाहणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच “रुग्णांचे हाल सहन केले जाणार नाहीत. या परिस्थितीस वैद्यकीय अधीक्षक जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी करण्यात आली.

रुग्णालयातील परिस्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Previous Post

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

Next Post

मंठा पंचायत समितीचे अधिकारी जोमात, सर्वसामान्य जनता कोमात!

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
24
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
167
Next Post
मंठा पंचायत समितीचे अधिकारी जोमात, सर्वसामान्य जनता कोमात!

मंठा पंचायत समितीचे अधिकारी जोमात, सर्वसामान्य जनता कोमात!

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In