• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

३७ हजार ५९९ जात प्रमाणपत्रे अवैध

अक्राणी प्रतिनिधी :-अनुसूचित जमातींचे ३७ हजार ५९९ जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा रत्नागिरी कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, अमोल पावरा, दत्तात्रय वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री


राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या स्थापनेपासून नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रमाणपत्र तपासणीसाठी तब्बल ७लाख ११ हजार ६५२ दावे जात दाखल झाले. यापैकी ६ लाख २६ हजार २०० जात प्रमाणपत्रे वैध ठरली, तर ३७हजार ५९९ अवैध ठरली आहेत. समित्यांनी इतर कारणाने निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या ३० हजार ७५० आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत जातपडताळणी समित्यांनी एकूण निकाली काढलेली प्रकरणे ६ लक्ष ९४ हजार ५५० आहेत, तर प्रलंबित जात प्रमाणपत्र दाव्यांची संख्या १७ हजार १०२ आहे.समाज कल्याण विभागातून सन १९८३ मध्ये आदिवासी विकास विभाग वेगळा झाल्यानंतर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे या प्रकरणात ठाकूर, कोळी महादेव, हलबा, गोंड, माना, मन्नेरवारलू, टोकरे कोळी, ठाकर या जमातींत सर्वाधिक घुसखोरी आहे तर ओरॉन, कोया, डोंगर कोळी, कोळी डोर, टाकणकार, पारधी, छत्री, कवर, कमार, ओझा, नायकपोड, अराख, बिझवार, भुजीया, पावरा, तडवीभील या जमातींचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहे.

परंतु, त्यांचे प्रमाण नगण्य आहे. या जमातीत कमी घुसखोरी आहे.केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाने जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम २००० व नियम २००३ तयार केले आहेत. जमातींचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी आतापर्यंत राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, गडचिरोली, पालघर, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, धुळे व नाशिक-२ अशा १५ तपासणी समित्यासुद्धा स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यात अनुसूचित जमातीमध्ये पूर्वी प्रमुखजमाती ४७ होत्या. त्यातील दोन जमाती वगळण्यात आल्या असून, आता ४५ जमाती आहे. या ४५ जमातीच्या उपजातींसह एकूण जमातींची संख्या १८१ आहेत. यातील काही जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात मूळजमातींच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा लाटण्यासाठी घुसखोरी झाल्याचे घेऊन आदिवासींच्या सवलती चित्र आहे.


बोगस जात प्रमाणपत्राला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘अधिनियम २०००’ पारित केला आहे. परंतु, खोटे जात प्रमाणपत्र घेणारे व देणाऱ्यांवर शासन कारवाई करीत नाही. म्हणून अनुसूचित जमातींचे ३७ हजार ५९९ जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्य भर आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Previous Post

दापोली येथे आदिवासी समाज भवन बांधण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – बिरसा फायटर्सची मागणी

Related Posts

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
Blog

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

August 13, 2026
1
साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.
Blog

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

August 13, 2026
7
Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
60
Next Post
४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – बिरसा फायटर्सची मागणी

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या - बिरसा फायटर्सची मागणी

ताज्या बातम्या

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

August 13, 2026
आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

August 13, 2026
विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In